लहुजी नगर येथे शौचालय खचल्याने महिला जखमी

शौचालय तातडीने दुरुस्त करण्याची लहुजी शक्ती सेनेची मागणी

- Advertisement -

कल्याण : संदीप शेंडगे 

मोहने लहुजी नगर येथील जुने शौचालय खचल्याने गरोदर महिला जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लहुजी नगर येथे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे जुने शौचालय आहे. या शौचालयाची दुरुस्ती करण्याकरिता पालिका प्रशासनाला पत्रव्यवहार करण्यात आला होता तरीही पालिका प्रशासन या शौचालयाच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करीत होते. सकाळी एक गरोदर महिला सौचालयाचा वापर करावयास गेली असता शौचालय अचानक खचल्याने महिला खड्ड्यात पडली महिलेने आरडाओरडा केल्याने येथील गणेश जाधव आणि रामचंद्र म्हात्रे यांनी या महिलेच्या मदतीला जाऊन तिला खड्ड्यातून बाहेर काढले. वेळीच मदतीला येथी ल नागरिक धावल्याने महिलेचा जीव वाचला असून जवळील दवाखान्यात महिला उपचार घेत आहे. पालिकेच्या अशा भोंगळ कारभाराविरोधात नागरिक चांगलेच संतापले असून लहुजी शक्ती सेनेचे युवा अध्यक्ष श्रावण बनसोडे यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश पवार यांना निवेदन देऊन तातडीने जुने शौचालय दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. स्वच्छालय खचल्याने लहुजी नगर येथील नागरिक संतप्त झाले असून तातडीने शौचालयाची दुरुस्ती न झाल्यास कल्याण तालुका युवा अध्यक्ष श्रावण बनसोडे श्याम फुलोरे राजू दुरदेव यांनी अतिरिक्त आयुक्त यांना पत्र देऊन आंदोलनाचा इशारा दिला आहे.