रेशन दुकानदाराच्या मनमानी कारभारामुळे ककाणे गावातील ३६ रेशनधारक वंचित

जय आदिवासी युवा शक्ती (राष्ट्रिय) महाराष्ट्र प्रदेश यांच्यावतीने कळवण तहसिदार यांना निवेदन

- Advertisement -

प्रतिनिधी:-पुंजाराम खांडवी(कळवण)9503329614

ककाणे गावातील रेशन लाभार्थीना रेशन च्या लाभापासून वंचित ठेवल्याबद्दल … जय आदिवासी युवा शक्ती (राष्ट्रिय) महाराष्ट्र प्रदेश यांच्यावतीने कळवण तहसिदार यांना निवेदन देण्यात आले.
रेशन दुकान म्हटल की कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चैत येत असते पण सर्वाधिक बिकट असते ते म्हणजे समाजातील दारिद्र्य रेषेखालील जीवन हे जिवण जगत असलेल्या गरजू कुटुंबांचे हक्काचे घास हिरावले जातात त्यावेळी हे मुद्दे ऐरणीवर येतात तेव्हा त्याला अन्याय म्हणतात…असाच काहीसा प्रकार ककाणे गावातील रेशनदुकादराच्या कारभारावरून गेल्या वर्ष भरात बघायला मिळाला असुन…येथील रेशन दुकानदाराने मनमानी कारभार करणे, कोणतीही सुचना न देता रेशन वाटणे,पावती न देणे,ऑनलाईन पावतीनुसार रेशन वाटप न करणे, दुकानाबाहेर आवश्यक माहिती फलक, भावफलक न लावणे यांसारख्या बाबींतून गरीब कुटुंबावर अन्याy केल्याचे पाह्याला मिळात आहे.

मात्र आता या विरोधात त्या रेशन दुकानदाराचा मनमानी कारभार विरुद्ध दि.29/7/2022 रोजी ककाणे गावातील *जय आदिवासी युवा शक्ति (जयस) संघटनेडुन तहसिलदार यांना निवेदन दिले आहे. ककाणे गावातील 36 राशनकार्ड म्हणजेच जवळपास 128 युनिट इतके धान्य तक्रारदार लाभार्थ्यांना नियमित देण्यात आले नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

सर्वसामान्य जनतेचे हक्काचे रेशन देण्यात यावे व योग्य ती कार्यवाही करण्यात यावी अन्यथा जय आदिवासी युवा शक्ति नाशिक (जयस) संघटनेकडुन तीव्र जनआंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी निवेदनातून देण्यात आला. या वेळी संघटनेचे पद्अधिकारी :- ॲड.अविनाश जोंधळे ,जिल्हा अध्यक्ष:-भगवान खिल्लारी, ॲड .निलेश ठाकरे, युवराज थैल, सुभाष खैरनार, संदीप ठाकरे, विश्वास ठाकरे आदि सह उपस्थित होते…