ओबीसी आरक्षण मिळाल्याने दिवा भाजपचा जल्लोष

- Advertisement -

ओबीसी आरक्षण मिळाल्याने दिवा भाजपचा जल्लोष

दिवा ( शंकर जाधव )

ओबीसी आरक्षण व द्रोपती मुर्मु यांना बहुमतात राष्ट्रपती झाल्याबद्दल ठाणे शहर जिल्हाध्यक्ष आमदार निरंजन डावखरे साहेब व ठाणे शहर आमदार संजयजी केलकर साहेब यांच्या नेतृत्वात दिवा भाजपकडून दिवा स्टेशन येथे जल्लोष कार्यक्रम आयोजित केला गेला होता सर्वोच्च न्यायालय कडून ओबीसी आरक्षण लागू केल्याच्या आनंदात हा कार्यक्रम आयोजित केला होता ढोल ताशाच्या गजरात भाजपा पदाधिकाऱ्यांनी फटाके वाजवून आणि मिठाई वाटून हा आनंदोत्सव साजरा केला ओबीसी वर्गाला आरक्षण मिळाल्या बद्दल प्रतिक्रिया देताना रोहिदास मुंडे यांनी सांगितले की हा विजय युती सरकारचा आहे फडवणीस आणि शिंदे सरकारने कोर्टात दिलेला इम्पेरियल डेटा च्या आधारावरती ओबीसी वर्गाला आरक्षण मिळाला भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मिळून हा आनंद साजरा केला यावेळी दिवामंडल अध्यक्ष रोहिदास मुंडे ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष विनोद भगत दिवा मंडळ ओबीसी मोर्चा अध्यक्ष रोशन भगत महिला मोर्चा अध्यक्ष ज्योती पाटील संघटक सरचिटणीस दिलीप भोईर सरचिटणीस समीर चव्हाण युवराज यादव युवा मोर्चा अध्यक्ष सचिन भोईर उत्तर भारतीय अध्यक्ष अजय सिंग अवधराज राजभर व्यापारी सेल अध्यक्ष जयदीप भोईर वार्ड अध्यक्ष नागेश पवार वीरेंद्र गुप्ता राहुल साहू जिलाजीत तिवारी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.