अनेकता मे एकता यही हमारी विशेषता- डॉ. किशोर पाटील*

- Advertisement -

 

*अनेकता मे एकता यही हमारी
विशेषता- डॉ. किशोर पाटील*

 

  • भिवंडी : (मनिलाल शिंपी) आपलं जीवन आनंदी असावं असं प्रत्येकाला वाटतं असा निखळ आनंद जीवनात कसा प्राप्त होऊ शकतो यासाठी आपण सर्व भाषिक पत्रकार महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ
    कोकण विभागाच्या वतीने एकत्र आलो आहोत, अशाच प्रकारची एकता आपण पत्रकार संघाच्या माध्यमातून एकत्र कायम टिकऊन ठेवू अशी मला आशा आहे, आपण सर्वजण माझ्यावर विश्वास ठेवून एकत्र येता त्यामुळे मलाही समाधान वाटते, आज आपण दुगाड फाटा येथील एस.बी.फार्म हाऊस येथे एक दिवसीय सहलीचे आयोजन करून ती सहल यशस्वीपणे पार पाडली त्याबद्दल मी आपणा सर्वांचे मनापासून आभार मानतो. व आजच्या दिवशी आपले सदस्य तथा पोलीस पाटील संघटनेचे भिवंडी तालुका अध्यक्ष श्री. सोमनाथ ठाकरे व श्री.मेहंदी हसन या दोघांचा वाढदिवस साजरा करण्याचा आपणा सर्वांना योग आला त्यामुळे त्या दोघांनाही आनंद वाटला, व हा अविस्मरणीय क्षण ते व आपण कधीही विसरू शकत नाही अशा प्रकारचा हा आनंद आपण सर्वांनी एकत्र येऊन साजरा केला यापुढे ही आपण पुढील महिन्यात एक अजून सहल आयोजन करू व अशाच प्रकारे सर्वजण मोठ्या संख्येने सहभागी होऊन मनोरंजन करू! कारण आपल्या पत्रकार संघात सर्व जाती धर्माचे पत्रकार सर्व धर्म समभाव या नात्याने एकत्र आलो आहोत,
    म्हणून मी अभिमानाने सांगतो की अनेकता मे एकता यही हमारी विशेषता हैं, तसेच आपल्या सोबत आज महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ भिवंडीचे ग्रुप् अध्यक्ष आचार्य सुरजपाल यादव, भिवंडी पत्रकार संघाच्या अध्यक्षा कुसुमताई देशमुख, भिवंडी प्रेस क्लब चे अध्यक्ष संतोष चव्हाण, भिवंडी ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्र काबाडी, संघाचे सदस्य खान फखरे आलम, ही सर्व मंडळी आपल्या सोबत आल्यामुळे आजच्या या सहलीचा आनंद द्विगुणित झाला म्हणायला वांवग ठरू नये , असे यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे कोकण विभागीय सचिव डॉ.श्री.किशोर बळीराम पाटील यांनी यावेळी सांगितले,
    तसेच सुरजपाल यादव, कुसुमताई देशमुख,राजेंद्र काबाडी, लवलेश सुतार, श्रीनिवास सिरीमल्ले, संदीप गुप्ता, एस.बी.अंसारी,यांनीही सोमनाथ ठाकरे व मेहंदी हसन या दोघांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन आपले मनोगत व्यक्त केले,
    या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन कोकण विभागीय सचिव डॉक्टर श्री किशोर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भिवंडी ग्रुपचे अध्यक्ष आचार्य सुरजपाल यादव यांनी सर्वांना वैयक्तिक मेसेज करून व प्रत्यक्ष फोन करून एकत्र केले त्याबद्दल सर्व पत्रकारांच्या वतीने त्यांचेही आभार मानण्यात आले, या एक दिवसीय सहलीला खालील सर्व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते, त्यामध्ये अरुण मिश्रा, नीलम तिवारी, चंद्रप्रकाश तिवारी, जगदीश पताळे, राज पाठक , परवीन खान, दिपक हिरे , दिपक देशमुख, ॲड.चांदबी मुजावर यांचा समावेश आहे