डोंबिवली स्टेशनबाहेर फ्री स्टाईल मारामारी धारदार शस्त्र दाखवत धमकी

- Advertisement -

डोंबिवली ( शंकर जाधव ) नेहमी गजबलेल्या डोंबिवली पूर्वेकडील स्टेशनबाहेरील परिसरात फ्री स्टाईल मारामारी झाल्याची घटना घडली.भररस्त्यात धारदार शस्त्र दाखवत धमकी दिली जात असल्याचे नागरिकांनी पाहिले असता काही वेळ स्टेशनबाहेरील परिसरात वातावरण तापले होते.मात्र काहीं लोकांनी वेळीच मध्यस्थी केल्याने अनर्थ टळला.डोंबिवली रामनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोघांना ताब्यात घेतले.ही घटना मंगळवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडली.

डोंबिवली पूर्वेकडील स्टेशनबाहेरील परिसरात मंगळवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास मारामारी झाली. ‘तू माझ्याकडे का बघतोस’ या क्षुल्लक कारणांवरून वाद झाला. वादाचे पर्यवसान मारामारीत झाल्याने काही वेळ वातावरण तापले होते.मारामारी करताना एकाने धारदार शस्त्र बाहेर काढल्याने बघ्यांची घाबरगुंडी उडाली होती.मात्र काही लोकांनी मध्यस्थी करून मारामारी सोडवली.सदर घटनेची माहिती मिळताच डोंबिवली रामनगर पोलीस घटनास्थळी धावत आले.मारामारी करणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

दरम्यान स्टेशनबाहेर भरदिवसा धारदार शस्त्र बाहेर काढून मारामारी केल्याचे दृश्य काही नागरिकांनी आपल्या मोबाईल मध्ये कैद केले.स्टेशन बाहेर मारामारी झाल्याची हि पहिली घटना नसून यापूर्वी तीन वर्षांपूर्वी मधूबन गल्लीत मारामारी झाल्याची घटना घडली होती.