भंडारदरा परिसरात जोरदार पाऊस असल्यामुळे भंडारदरा धरणातून पाणी सोडण्यात आले!

- Advertisement -

अकोले (भंडारदरा) प्रतिनिधी-

वैभव बुळे

दि .२० /०७/२०२२ 

भंडारदरा परिसरात जोरदार पाऊस सुरू असून पाणलोटात पाण्याची आवक वाढत असल्याने. भंडारदरा धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी धरणातून 2339 क्युसेकने प्रवरा पात्रात पाणी सोडण्यात आले.11039 दलघफू क्षमतेच्या या धरणात सध्याचा पाणी साठा हा 9390 दलघफू म्हणजेच 85% टक्के झाला होता. परंतु पावसाचे प्रमाण असेच टिकून राहिल्यास तसेच वाढल्यास ओहरफ्लोत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

सोमवारपासून पावसाचा जोर पुन्हा वाढल्याने पाणी नियंत्रित करण्यासाठी पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार काल मंगळवारी सकाळी 8 वाजता विद्युत गृह मधून 832, व्हॉल्व द्वारे 289 आणि स्पिल्वे गेट मधून 1218 असा एकूण 2339 क्यूसेकने पाणी सोडण्यात आले. दिवसभरात 90 दलघफु पाणी सोडण्यात आले. त्यामुळे निळवंडे धरण 80% टक्के भरले असून ते पण लवकरच ओहरफ्लो होण्याची शक्यता आहे.