माथेरान दस्तुरी नाका येथील वाहनतळावर महागड्या गाडीवर कोसळले झाड…

- Advertisement -

कर्जत बातमीदार – नितीन पारधी

माथेरान येथील दस्तुरी नाका वरील वाहनतळ येथे चार पार्किंग असून त्या पार्किंग मध्ये उभी करण्यात आलेल्या एका महागड्या गादीवर १४ जुलै च्य रात्री झाड कोसळले आहे.गादीवर झाड कोसळल्याने गाडीचे मोठे नुकसान झाले असून सुरु असलेले वापस आणि वादळी हवामान यामुळे झाडे कोसळण्याचे सत्र माथेरान मध्ये सुरु आहे.

मुंबई येथील पर्यटक माथेरान येथे पर्यटनासाठी आले होते,त्यांनी आपल्या सोबत आणलेली स्कोडा कंपनीची महागडी कार वाहनतळ येथे पार्क करून ते पर्यटक माथेरान शहरात पर्यटनासाठी गेले होते.१४ जुलै च्या रात्री त्या गादीवर मोठे झाड कोसळले होते. मात्र गाडीच्या मालकाला हि माहिती आज सकाळी मिळाल्याने ते त्या ठिकाणी पोहचले आणि झाडीचे झालेले नुकसान याबद्दल पाहणी केली. माथेरान येथील वाहनतळाची व्यवस्था वन अखत्यारीत असून संयुक्त वन संरक्षण समिती च्या माध्यमातून कर संकलन देखील केले जाते. त्यामुळे वादळात कोसळलेल्या झाडामुळे गाडीचे झालेलं नुकसान कोण भरून काढणार याबद्दल प्रश्न निर्माण झाले आहेत.