भाजपाच्या माजी नगरसेविका आणि उपमहापौर उपेक्षा भोईर यांचे प्रसंगावधान आणि समयसुचकता

- Advertisement -

टिटवाळा : दि.१३/०७/२०२२ रोजी कोसळणारा पाऊस व भरतीची वेळ असल्या कारणामुळे अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचण्यास सुरवात झाली अश्यावेळी सखल भागातील नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करणे व जेवणाची व्यवस्था करणे हे प्रथम प्राधान्य होतेच.परंतु पुरजन्य परिस्थिती ओसरल्या नंतर मोहिली जलशुद्धीकरण केंद्रातील उपकरणे हि पाण्या खाली गेल्या कारनामुळे बिघाड होऊन त्यांच्या दुरूस्ती साठी तब्बल ४ ते ५ दिवसांचा कालावधी जातो या दरम्यान संपुर्ण परिसरात पिण्याच्या पाण्याची गैरसोय होते हि बाब लक्षात ठेवून लागलीच मोहिली जलशुद्धीकरण केंद्रातील अधिकाऱ्यांना संपर्क करून पाणी वाढण्याआधीच सर्व उपकरणे काढून सुरक्षित ठिकाणी ठेवण्याबाबत भाजपाच्या माजी नगरसेविका आणि उपमहापौर यांनी केल्या .
याच प्रसंगावधानामुळेच टिटवाळा करांना कोणत्याच पाणी टंचाई ला सामोरे जावे लागणार नाही. त्यामुळे नागरिकांकडून त्यांच्या समयसुचकतेचे कौतुक केले जात आहे.

आज स्वतः मोहिली जलशुद्धिकरण केंद्रा वर उपस्थित राहून कल्याण डोंबिवलीमहानगर पालिका मोहिली जलशुद्धीकरण केंद्रातील स्वच्छतेचे काम पूर्ण करून घेऊन पाणी पुरवठा चालु केला आहे. त्यामुळे सर्व परिसरात टप्प्याटप्प्याने पाणी पुरवठा होणार आहे.
यावेळी पाणी गढूळ येण्याची शक्यता आहे त्यामुळे नागरिकांनी पाणी उकळून घेण्याबाबतही सुचना करण्यात आल्या. तसेच सर्व कामगार वर्ग यांनी युध्द पातळींवर काम करून पाणी पुरवठा चालु केल्याबद्दल त्यांचे देखील भोईर यांनी आभार व्यक्त केले .