भारतीय ट्रायबल पार्टी अकोले तालुका यांच्या वतीने ,शेतकरी समृद्धी मंडळाला जाहीर पांठींबा !

- Advertisement -

अकोले प्रतिनिधी : संकेत सामेरे 

अगस्ती सहकारी साखर कारखान्याची संचालक मंडळाच्या निवडीची निवडणूक प्रक्रिया मधे अकोले तालुक्यातील भारतीय ट्रायबल पार्टीच्या वतीने व तालुक्यातील कार्येकर्ते व पदाधिकारी यांच्या वतीने अगस्ती सहकारी साखर कारखाना निवडणूकितील शेतकरी समृद्धी मंडळाला आज जाहीर पाठींबा देण्यात आला. व मंडळाचे अध्यक्ष मा.आ.डॉ. किरण लहामटे साहेब यांच्या कडे भारतीय ट्रायबल पार्टीचे युवा नेते गणेश डगळे व तालुका अध्यक्ष संकेत सामेरे यांच्या वतीने पाठींब्याचे पत्र देण्यात आले व तमाम शेतकरी, ऊस उत्पादन मतदार यांना जाहीर आव्हान करण्यात येत आहे की शेतकरी समृद्धी मंडळाच्या निवडणूक लडवीत असलेल्या सर्व उमेदवार यांना कारखाण्याच्या सर्वांगीन विकासासाठी प्रचंड बहुमताने विजयी करावे अशे अवाहन भारतीय ट्रायबल पार्टीच्या वतीने करण्यात येत आहे.