डोंबिवलीतील फेरीवाल्यांचा पर्यावरण संदेश…

ग्राहकांना प्लास्टिकच्या पिशव्या देणार नाही

- Advertisement -

डोंबिवली ( शंकर जाधव )
प्लास्टिकच्या पिशव्या वापरणाऱ्यांवर बंदी असताना दुकान, मटण विक्री, किराणा दुकान, भाजी- फळे विक्री करणारे फेरीवाले सर्रासपणे प्लास्टिकच्या पिशव्या विक्री केल्या. पालिका प्रशासनाकडून अश्या दुकानदार व  फेरीवाल्यांवर दंडात्मक कारवाई सुरू आहे.मात्र डोंबिवलीतील पश्चिमेकडील फेरीवाल्यांनी ग्राहकांना  प्लास्टिक पिशव्या देणार नाही असे फलकच लावले.पर्यावरणाचा संदेश देणाऱ्या अश्या फेरीवाल्यांचा पालिका प्रशासनाने छोटेखानी सत्कार केल्यास इतर फेरीवाल्यांनी प्रोत्साहन  मिळेल असे नागरिकांचे म्हणणे आहे.
  डोंबिवली पश्चिमेकडील स्टेशनबाहेरील १०० मीटर पासून लांब बसलेल्या काही फेरीवाल्यांनी पर्यावरणाचा संदेश दिला आहे.भाजी विक्री करणारे अभय दुबे यांसह आजूबाजूकडील अनेक फेरीवाल्यांची फलव लावले आहेत.प्लास्टिकच्या पिशव्या मिळणार नाही, कागदी अथवा कापडी पिशव्या घेऊन या , त्यातच भाजी दिली जाईल असे ग्राहकांना येथील फेरीवाले आवर्जून सांगतात.
भाजी, फळे, खेळणी, घरगुती सामान, रेडिमेड कपडे, मोबाईल सामान, छत्र्या, महिलांची आभूषणे आदी वस्तूंची विक्री मोठ्या प्रमाणात होत असते. आणि अशा सामानांची खरेदी करतांना ग्राहक प्लास्टिक पिशव्यांची मागणी करतात.
याबाबत डोंबिवली पश्चिम गुप्ते रोडवरील फेरीवाले आणि कष्टकरी हॉकर्स युनियनचे सदस्य राजू गुप्ता आणि अभय दुबे यांनी यासाठी पुढाकार घेतला. जे ग्राहक पाच किलोच्या वर समान घेतील त्यांना स्वस्त भावात कापडी पिशवी देण्यात येईल असाही या फेरीवाल्यांचा उपक्रम आहे. त्याच्या या योजनेला पालिकेच्या ‘ह’ प्रभागक्षेत्रातील अधिकारी विजय भोईर यांचे सहकार्य मिळत असल्याचे फेरीवाल्यांनी सांगितले.