अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार 

इतर क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न

- Advertisement -

डोंबिवली ( शंकर जाधव )
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ डोंबिवली विभागाच्या वतीने  पूर्वेकडील सर्वेश सभागृहात शैक्षणिक तसेच इतर क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला.  कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून माधव जोशी, अर्चना जोशी, माजी नगरसेवक  मंदार हळबे हे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी विद्यार्थ्यांनर्थ्यां मार्गदर्शन करण्यात आले.
     या सोहळ्याचे औचित्य साधून बदलापूर शहर संघटक म्हणून गिरीश  देशपांडे यांना मुंबई  प्रदेशाध्यक्ष अमरेंद्र पटवर्धन यांच्याकडून नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.मान्यवरांनी विद्यार्थ्यांना  स्वानुभव व सामाजिक परिस्थितीचा संदर्भ देत आयुष्यामध्ये यशस्वी कसे व्हावे याच्यासाठी मार्गदर्शन केले.काही विद्यार्थ्यांनी व पालकांनी  मनोगत व्यक्त केले.कौतुक सोहळ्यापूर्वी निधी पळसुले देसाई हिने नृत्य सादरीकरण  केले.
कौस्तुभ आपटे आणि मृण्मयी भिडे यांनी अभंग सादर केले. संवादिनी साथ भाग्यश्री निमकर -दातार, तबला साथ गिरीश आठल्ये,निवेदिका प्राची भावे यांची साथ मिळाली.मुंबई प्रदेशाध्यक्ष अमरेंद्र पटवर्धन, तसेच ठाणे जिल्हा अध्यक्ष  शशांक खेर व सहकाऱ्यांनी कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले.