शाळा सुरु झाल्या आता मोबाईल नको मैदाने खेळांकडे लक्ष द्या

    मनसेचा विद्यार्थ्यांना मोलाचा सल्ला

- Advertisement -

डोंबिवली ( शंकर जाधव )

कोरोना काळात मोबाईलवरून ऑनलाईन पद्धतीने शाळा सुरु होत्या. दोन वर्षांनंतर शाळेची घंटा वाजली असली तरी अजूनही मोबाईलपासून विद्यार्थी लांब गेले नाही.आपला शारीरिक आणि बौद्धिक विकास हे मोबाईलने होणार नाही तर त्यासाठी मैदानी खेळ आवश्यक आहे.विद्यार्थ्यांनी मोबाईल पासून लांब राहिले पाहिजे असा मोलाचा सल्ला मनसेने डोंबिवलीतील दिला.

 

  महाराष्ट्रनवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसे कल्याण जिल्हाअध्यक्ष तथा माजी नगरसेवक प्रकाश भोईर आणि माजी नगरसेविका सरोज भोईर यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक आधार म्हणून शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी मनसे डोंबिवली शहरअध्यक्ष मनोज घरत,अरुण जांभळे, संदीप ( रमा ) म्हात्रे श्रीकांत वारंगे, संजय बाविस्कर आदि मान्यवर उपस्थित होते.डोंबिवली पश्चिम येथील मोठा गाव ठाकुर्ली येथील पालिकेच्या लोकमान्य टिळक शाळेत सदर कार्यक्रम पार पडला.यावेळी मनसे शहर अध्यक्ष घरत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देताना विराट कोहली या क्रिकेटपटूचे उदाहरण देताना खेळात देशाचे नाव जगात कोरले जात असताना शिक्षणाचे महत्व कसे आहे हे दाखवून दिल्याचे सांगितले.ते जिल्हाअध्यक्ष भोईर म्हणाले,गुरुवर्य शशिकांत ठोसर यांच्या संकल्पनेतून २३ वर्षांपूर्वी मोफत वह्या वाटप कार्यक्रम सुरु केला.गरीब विद्यार्थी शिकत असताना शैक्षणिक साहित्य मिळणे आवश्यक असल्याचा उद्देश समोर ठेवून २३ वर्षापासून दरवर्षी हा उपक्रम सुरु आहे.