शिवसेनेच्या मोर्चा नंतर भाजप आमदार गणपत गायकवाड यांचा सरकारवर निशाणा

- Advertisement -

 

कल्याण ( शंकर जाधव )

वीज पुरवठा खंडित मुद्यावरुन भाजपने महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. लोड शेडिंग विरोधात आंदोलन करणाऱ्या शिवसेनेवर पलटवार करत  भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी टीका केली आहे. कल्याण नजीक असलेल्या मलंगगड परिसरात लोड शेडींग सुरु झाली आहे. या लोड शेडिंगमुळे  नागरीकांना नाहक त्रस सहन करावा लागत आहे. भर कडक उन्हाळ्य़ात वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिक संतप्त झाले. शिवसेनेच्या वतीने कल्याणच्या वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर यासाठी  मोर्चा काढण्यात आला होता.

तर यावर भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी साधला सरकारवर निशाणा साधत  शिवसैनिकांनी महावितरण वर मोर्चा काढण्याऐवजी मातोश्री किंवा अजित दादा यांच्या बंगल्यावर मोर्चा काढला पाहिजे. शिवसैनिकांना माहिती पडले की, त्यांचे सरकार फेल आहे ही आनंदाची बाब आहे. २००९ ते २०१४ साली आघाडी सरकार असताना लोड शेडिंग होते. २०१४ मध्ये राज्यात भाजप सरकार आल्यावर लोडशेडिंग बंद झाले होते. आत्ता पुन्हा लोड शेडिंग सुरु झाल्याने राज्यकर्ते काही कामाचे नाहीत असा टोला लगावला.