स्वामी विवेकानंद विद्यामंदिरातील पाच शिक्षकांना राष्ट्रीय स्तरावरील आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

- Advertisement -

डोंबिवली ( शंकर जाधव )

राष्ट्रीय मानवी हक्क संघटना(NHRO) आयोजित, Indian icons award- 2021 सोहळा नवी दिल्ली येथील Lila ambience convention या पंचतारांकित हॉटेलमध्ये मोठ्या दिमाखात नुकताच पार पडला. या सोहळ्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.आदर्श शिक्षक या गटातील पुरस्कारासाठी महाराष्ट्रातील १७ शिक्षकांची निवड करण्यात आली होती. यात राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या स्वामी विवेकानंद विद्यामंदिर शाळेतील पाच शिक्षक या पुरस्काराचे मानकरी ठरले. विष्णुनगर माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक भोजराज रायसिंग दत्तनगर माध्यमिक शाळेच्या पर्यवेक्षिका सविता मगर (पर्यवेक्षिका- दत्तनगर माध्य.), अरुणोदय माध्यमिक शाळेतील सहाय्यक शिक्षिका स्वाती नाईक, गोपाळ नगर माध्यमिक शाळेतील सहाय्यक शिक्षिका अस्मिता पोतदार ,विष्णुनगर माध्यमिक शाळेतील सहाय्यक शिक्षक लक्ष्मण शिंदे यांना गौरवचिन्ह व सन्मान पत्र देऊन गौरवण्यात आले. सर्व स्तरातून या यशवंत शिक्षकांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.