अंगारक संकष्ट चतुर्थीनिमित्त  टिटवाळा गणेश भक्तांची मांदियाळी 

- Advertisement -

टिटवाळा : अंगारक संकष्ट चतुर्थी निमित्त टिटवाळा येथील प्रसिद्ध असलेल्या महागणपती मंदिरात काळाच्या नंतर पहिल्यांदाच पूर्वीप्रमाणे मंदिर श्री गणेश दर्शनासाठी खुले केल्यामुळे भक्तांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला होता . आपल्या लाडक्या गणरायाचे दर्शन घेण्यासाठी व्याकुळ झालेल्या गणेशभक्तांच्या  दर्शन घेण्यासाठी लांबच लाब रांगा लागलेल्या पाह्यला मिळाल्या. टिटवाळा येथील गणेश मंदिरात अंगारक संकष्ट चतुर्थीला दरवेळी मोठ्या प्रमाणात भाविक-भक्तांची गर्दी उसळत असते. मात्र अद्यापही कोरीनाची धूसर छाया असल्याने त्याचा परिणाम गर्दीवर झालेला दिसून येत होता. 
पहाटे चार वाजता महागणपती मंदिर टिटवाळा भाविकांसाठी खुले करण्यात आले . पहाटे श्री गणेश पूजन करून गणेश भक्तांना दर्शन रांगेतून मंदिरात प्रवेश देणे सुरुवात करण्यात आली. कोरोना काळाच्या नंतर पहिल्यांदाच पूर्वीप्रमाणे मंदिर श्री गणेश दर्शनासाठी खुले केल्यामुळे मुंबई उपनगर तसेच आजूबाजूच्या परिसरांमधून अनेक भाविकांनी आपल्या परिवारासह श्री गणेश दर्शन घेतले दर्शन रांगेतून दर्शन घेण्यासाठी जवळ-जवळ दोन ते तीन तास उभे राहूनही भाविकांनी मनातील मनोकामना पूर्ण करण्यासाठी गणरायाला साकडे घातले .  रात्र पर्यंत हजारोच्या संख्येने भाविक येऊ शकतात असे विश्वस्तांच्या वतिने सांगितल्याने त्या अनुषंगाने भाविकांना दर्शन सुलभ व्हावे यासाठी स्थानिक पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवून मंदिर परिसरात कोणतीही वाहने प्रवेश करणार नाही याची खबरदारी घेत सर्व बाजूंनी रस्ते बंदिस्त केले होते . अनेक वर्षापासून अनिरुद्ध बापूंचे अनुयायी मंदिरामध्ये सेवा देण्यामध्ये तत्पर होते . दुपारी २ च्या दरम्यान ५० हजारच्या वर भाविकांनी दर्शन घेतले होते तर रात्रीपर्यंत भक्तांची संख्या एक लाखापर्यंतचा टप्पा पार करेल असा विश्वास मंदिर ट्रस्टचे योगेश जोशी यांनी व्यक्त केला. 
 
“मागील कोरोना काळात अंगारक संकष्ट चतुर्थी असतनाही बाप्पाचे दर्शन घेता भक्तांना मनासारखे घेता आले नव्हते मात्र  आज मनासारखे दर्शन झाल्याने मन प्रसन्न झाले असून  येणारा काळ हा गणरायाच्या कृपेने नक्कीच सुखदायक असेल ” –   संजय पारेकर  भाविक
 
“अंगारक संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आमचा व्यवसाय नक्कीच चांगल्या प्रकारे होतो . कोरानाच्या महामारीने आमच्या व्यवसायावर गदा आली होती. मात्र आजची भक्तांची संख्या त्या मानाने दिलासादायक ठरणारी होती. “
मोहन शेलार , पुजा साहित्ये विक्रेता, टिटवाळा
 
 “अंगारक चतुर्थीला मोठ्या प्रमाणावर भाविक भक्त टिटवाळ्यात येतात. मात्र कोरोनाच्या काळात आमच्या रिक्षा चालकांच्या व्यवसायावर याचा परिणाम झाला मात्र आजचे चित्र आशादायक होते . हेही दिवस जातील आणि सगळे सुरळीत होईल असा आशावाद रिक्षा युनियन अध्यक्ष, टिटवाळा बाळा भोईर,  यांनी व्यक्त केला.”