मनसेच्यावतीने आरसीटीपीसीआर आणि ऐनटिजन टेस्ट शिबिराचे आयोजन

- Advertisement -

टिटवाळा 

सध्याची कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता आपल्या विभागात सर्वाची काळजी घेणं गरजेचे आहे याच दृष्टीने मनसेच्या वतीने  आर.के.नगर आणि मल्हार नगर विभागातील नागरिकांसाठी  दिनांक ११ मे रोजी सकाळी १०.०० ते २.०० या वेळेत मोफत आरसीटीपीसीआर आणि ऐनटिजन टेस्ट शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .  परिसरातील  नागरिकांनी या शिबिराचा मोठ्या संख्येने लाभ घेतला . त्याबरोबरच मनसेने राबविलेल्या या उप्रक्रमाबद्दल नागरिकांकडून  आभार व्यक्त करण्यात आले.

या प्रसंगी  मनसेचे उप शहर अध्यक्ष  धनंजय पाटीलसाहेब , उपाअध्यक्ष  समिर विष्णु मेस्त्री ,गट अध्यक्ष सचिन कीलजे ,ऋषिकेश मेस्त्री ,कुणाल चक्रवर्ती,वाहतूक सेनेचे उपचिटनिस , कल्पेश कबरे , जहांगीर बलदार  यांसह पदाधिकारी आणि महिला पाधिकरी ,आजी माजी कार्यकर्ते यांनी उपस्थिती दर्शवली होती.